criticism on indian government: चौकीदाराने प्रामाणिक काम केले नाही

swami avimukteshwar

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : काही लोक आपण चौकीदार असल्याचे सांगतात, पण त्याने त्याचे काम प्रामाणिक केले असते तर असा हल्ला कुणाची हिम्मत झाली नसती, अशा शब्दांत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी टीका केली. (criticism on indian government)

पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळ त्यांनी केंद्र सरकार टीकास्रही सोडले.

हल्ला करून दहशतवादी निघून गेले, आरामात गेले, त्यावेळी चौकीदार कुठे होता, असा सवाल करून स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, आता या चौकीदाराची चर्चा कुठेच होत नाही. आम्ही त्यांना धडा शिकवू अशी आता भाषा सुरू झाली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

शस्त्र आणि शास्त्रही शिकले पाहिजे

ते म्हणाले, बाहेरचे लोक येऊन तब्बल २० ते ३० मिनिटे फायरिंग करून आमची माणसे मारून गेले, ते कसे आणि कुठून आले, याचा काहीच पत्ता लागला नाही. या घटनेवरून लक्षात येईल की आता हिंदूला स्वत:ची सुरक्षा स्वत:च करावल लागेल. गरज पडल्यास शस्त्र आणि शास्त्रही शिकले पाहिजे आणि शस्त्र बाळगलेही पाहिजे. सुरक्षा पुरविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मारणारा शेकडो किमीवरून त्याच्यासह मोठमोठे शस्त्र घेऊन आला. आता प्रत्येक हिंदूला स्वतःची सुरक्षा स्वतः करावी लागेल. (criticism on indian government)

यात्रा बंद करणे अयोग्य

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा बंद करण्याला विरोध दर्शवला. सुरक्षा व्यवस्था पुरवून या यात्रा सुरू ठेवल्या पाहिजेत. कुणीतरी भारताला आव्हान देत आहे. हिंदू आहे का? असे विचारून मारले जाते. याचा अर्थ हे थेट भारताला, सरकारला आणि आपल्या नेत्यांना आव्हान आहे. सरकारने या आव्हानाला प्रत्युत्तर दिले पाहिजे. हिंदू धर्माचार्य म्हणून मीही आपली सुरक्षा कशी राखली जाईल, यासाठी विचारमंथन सुरू आहे. (criticism on indian government)

पहेलगाम हल्ल्यानंतर उत्तराखंडमध्ये चालणाऱ्या चार धाम यात्रेवर विचार केला जात आहे. हल्ल्यामुळे यात्रा बंद करावी, असा विचार केला जात आहे, असे कळते. पण ही यात्रा बंद करू नये, याचा पुनरूच्चारही शंकराचार्यांनी यावेळी केला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर