Couple accidental death : गॅस गिझरच्या गळतीने नवदाम्पत्याचा मृत्यू

Couple accidental death

कोल्हापूर : प्रतिनिधी : बाथरुममधील गॅस गिझरमध्ये गळती होऊन नवदांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात घडली. सागर सुरेश कळमकर (वय ३२), आणि त्यांची पत्नी सुषमा करमळकर (वय २६ दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) असे दुर्दवी दांम्पत्याचे नाव आहे. आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यू कारण स्पष्ट होईल अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली. विवाहास जवळपास एक महिना होत असताना त्यांच्या दुर्दवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Couple accidental death)

या घटनेची माहिती अशी की, सागर आणि सुषमा यांचा विवाह वीस मे रोजी झाला आहे. काल रविवारी (ता. १५) दोघे पती पत्नी आंबोलीला फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी परतले. सोमवारी त्याचे मित्र सागरला कॉल करत होते. पण त्यांचा फोन बंद होता. त्यांचे मित्र आज सोमवारी सकाळी बुरुडेपैकी भावेश्रवरी कॉलनीतील घरी भेटण्यासाठी गेले. घराच्या समोरील दरवाजाला किल्ली अडकवलेली होती आणि दरवाजा उघडा होता. ते आत गेले असता गॅसचा वास येत होता. त्यावेळी दोघे बाथरुममध्ये पडले होते. दोघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.  या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Couple accidental death)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर