प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागनाथअण्णांच्या नावे महामंडळ

मुंबई;  प्रतिनिधी : राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१०) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत तब्बल ८० निर्णय घेण्यात आले. (Nagnath Naikwadi)

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी उभी हयात कष्टकरी शेतकरी, शेतमजूर आणि धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी घालवली. त्यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शेतीला पाणी तसेच वीजनिर्मिती यासाठी राज्यभरात धरणांची उभारणी करण्यात आली. धरणे, कालवे तसेच विविध विकासप्रकल्प उभारले गेले. या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या, भूमिपुत्रांच्या जमिनी आणि घरे गेली. त्यांच्या पुनर्वसनाबाबतच्या अनेक मागण्या शासनस्तरावर गेली अनेक वर्षे पडून आहेत. राज्यातील विविध प्रकल्पबाधितांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी पुनर्वसन महामंडळाची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ती यानिमित्ताने पूर्ण झाली. तसेच या महामंडळाला नागनाथअण्णांचे नाव देऊन राज्य सरकारने त्यांचाही गौरव केला आहे. (Nagnath Naikwadi)

क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी विद्यार्थीदशेतच चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. त्यानंतर सातारच्या प्रतिसरकाच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात सशस्त्र उठाव केला.

स्वातंत्र्यानंतर हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याची स्थापना केली. त्या माध्यमातून शिक्षण आणि सहकार चळवळीत उल्लेखनीय कार्य केले. कष्टकरी शेतकरी, शेतमजूर आणि धरण व प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी चळवळ उभारली. १९९३ साली वारणा आणि कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अन्य प्रश्नांवर त्यांनी मुंबईत मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. दुष्काळी भागातील १३ तालुक्यांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने सांगली जिल्ह्याच्या आटपाडी येथे दरवर्षी पाणी परिषदाही भरवल्या. सरकारने साखर कारखान्यांवर आयकर लादण्याच्या निर्णयाविरोधातही त्यांनी यशस्वी लढा दिला.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ