Congress MLA arrested: कर्नाटक काँग्रेसच्या आमदाराला अटक; बेकायदा सट्टेबाजी, १२ कोटीची रोकड जप्त

Congress MLA arrested

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी (२३ ऑगस्ट) कर्नाटक काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांना गंगटोकमध्ये अटक केली. बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. (Congress MLA arrested)

आमदार वीरेंद्र त्यांच्या सहकाऱ्यांसह सिक्कीममधील गंगटोक येथे गेले होते. तिथे ते कॅसिनोसाठी जमीन भाड्याने घेत होते, असा आरोप आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने त्यांच्या ३० ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर वीरेंद्र यांना अटक करण्यात आली. या छाप्यात १२ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. यामध्ये अंदाजे एक कोटी परकीय चलन, ६ कोटी रुपये (अंदाजे) किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे १० किलो चांदीच्या वस्तू आणि चार वाहने जप्त करण्यात आली.(Congress MLA arrested)

ईडीने वीरेंद्र यांची १७ बँक खाती आणि दोन बँक लॉकर देखील गोठवले.

वीरेंद्र यांचा भाऊ केसी नागराज आणि त्याचा मुलगा पृथ्वी एन राज यांच्या घरातून मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली.

त्याचे इतर सहकारी म्हणजे भाऊ केसी थिप्पेस्वामी आणि पृथ्वी एन राज – दुबईतून ऑनलाइन गेमिंगचे ऑपरेशन्स हाताळत असल्याचा आरोप आहे.

शोध कारवाईदरम्यान जप्त केलेल्या गुन्हेगारी साहित्यातून रोख आणि इतर निधीचा समावेश असल्याचे दिसून आले.

वीरेंद्र यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील रकमेची ओळख पटविण्यासाठी गंगटोक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

गोव्यात, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राइड, ओशन ७ कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनोची अशा पाच कॅसोनीची झडती घेतली. हे सर्व कॅसिनो आमदार वीरेंद्र यांच्याशी संबंधित आहेत.(Congress MLA arrested)

आरोपी (के.सी. वीरेंद्र) किंग ५६७, राजा५६७, पपीज००३ आणि रत्ना गेमिंग सारख्या अनेक ऑनलाइन बेटिंग साइट्स चालवत असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. याशिवाय, त्यांचा भाऊ केसी थिप्पेस्वामी दुबईतून डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज, प्राइम९टेक्नॉलॉजीज अशा तीन व्यावसायिक संस्था चालवतो. सूत्रांनी सांगितले की, या संस्था के.सी. वीरेंद्रच्या कॉल सेंटर आणि गेमिंग व्यवसायाशी संबंधित आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर