Coast Guard : १८०० कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त

Coast Guard

Coast Guard

पोरबंदर : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाईत सुमारे १८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयसीजी जहाजाने आंतररराष्ट्रीय सागरी सीमेरेषेजवळ ट्रान्सशिपमेंटचा प्रयत्न रोखला. आयजीसीने सम्रुदात फेकून दिलेले अंमली पदार्थ जप्त केले. (Coast Guard)

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत १२ एप्रिल रोजी मध्यरात्री कारवाई केली. दोन्ही एजन्सीच्या समन्वयाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएसच्या विश्वाहार्य माहितीच्या आधारे आयसीजी जहाजाला रात्रीच्या अंधारातही एक संशयित बोट दिसून आली. आयसीजीचे जहाज जवळ जाऊ लागता संशयित बोटीतील व्यक्तीने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यापूर्वीच अंमली पदार्थांचा साठा सम्रुदात टाकला. (Coast Guard)

आयजीसीने संशयित बोटीचा पाठलाग केला आणि समुद्रात टाकलेला अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यासाठी समुद्र बोट तत्काळ बोलावण्यात आली. संशयित बोटीने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याने पाठलाग थांबवण्यात आला. रात्री कसून तपास करत सम्रुदात टाकलेला अंमली पदार्थाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. जप्त केलेले अमली पदार्थ आयसीजी जहाजाने पुढील तपासासाठी पोरबंदर येथे आणले आहेत. आयसीजी आणि एटीएस यांच्या संयुक्त सहकार्यामुळे अलिकडच्या काळात अशा १३ यशस्वी कारवाया झाल्या आहेत. (Coast Guard)

हेही वाचा :

मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

Related posts

Athani murder

Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत

Bhamin samaj Morcha

Bhamin samaj Morcha: जानवे काढायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Ex DGP Murder Case

Ex DGP Murder Case: ‘मी त्या राक्षसाला ठार केले…’