जयसिंगपूर; प्रतिनिधी : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली. या निवडणुकीतही त्यांना प्रचंड मताने विजयी करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना निश्चित ताकद देतील, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदार यड्रावकर यांनी विश्वास ठेवून सहकार्य केले. तोच विश्वास सार्थ करून मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्र्यांनी यड्रावकर यांना १९०३ कोटींचा विकासनिधी दिला. यड्रावकर यांनी पै – पै चा हिशोब प्रगती पुस्तकात दिला आहे. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. गावागावातील समस्या जाणून तो सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेला असतो. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कार्यामुळे परिसरातील लोक सुखावले आहेत. महापूर काळात यड्रावकरांनी पूरग्रस्तांच्या हिताचे काम करून त्यांना दिलासा दिला आहे.
राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, मतदारांमुळे शिरोळ तालुक्यातील विकासासाठी १९०३ कोटीचा निधी मिळाला. यामुळे गावागावाचा सर्वांगीण विकास करता आला. व्यक्तिगत लाभार्थ्यांनाही शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यत पोहचवल्या. शिरोळ गावच्या विकासासाठी १०० कोटी ६२ लाखाचा निधी आणला. पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि सीनियर कॉलेज सुरू करणार आहे.
खासदार धैर्यशील माने, योगेश खाडे, मल्लाप्पा चौगुले, रणजीत पाटील, मनीषा डांगे, बबन यादव, दशरथ काळे, अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सतिश मलमे, प्रमोददादा पाटील, मल्लाप्पा चौगुले, चंद्रकांत मोरे, अमरसिंह पाटील, बाबासो वनकोरे, डॉ. नीता माने, राकेश खोंद्रे, श्रीपती सावंत, बाबा पाटील, माधुरी टाकारे, एन. वाय. जाधव, रामदास गावडे, सीता निकम, आसमा पटेल, शोभा कोळी, आरती गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा पाटील यांनी आभार मानले.