कन्नोर : परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अंध महिलेने जगातील सर्वात मोठ्या माउंट एव्हरेस्ट सर करुन भारताचा तिरंगा फडकावला. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील छोंझिन अंगमो असे या महिलेचे नाव आहे. भारताची पाहिली आणि जगातील पाचवी अंध महिला म्हणून छोंझिन अंगमोने आपले इतिहासात नाव कोरले. (Chhonzin Angmo)
छोंझिनने वयाच्या आठव्य वर्षी दृष्टी गमावली. पण नऊमेद न होता तिने जिद्दीच्या जोरावर इतिहास रचला. माउंट एव्हरेस्टवर चढाई केल्यानंतर उर्वरित शिखरे देखील गाठायची असल्याचे तिने सांगितले. अंगमोचा जन्म भारत तिबेट सीमेवरील किन्नौर जिल्ह्यातील चांगो गावात झाला. तिने दिल्ली विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या त्या दिल्लीतील एका बँकेत कार्यरत आहेत. अंधत्व माझी कमजोरी नसून माझी ताकद आहे. या कमजोरीला ढाल बनवून पर्वत चढणे हे माझे बालपणीचे स्वप्न होते. परंतु आर्थिक अडचण हे मोठे आव्हान होते. पण अखेर मी माझे स्वप्न पूर्ण केले. (Chhonzin Angmo)
आपल्या मुलीच्या यशाबद्दल अंगमोचे वडील अमर चंद भाविक झाले. ते म्हणाले, मला अद्याप तिच्या यशाची माहिती नाही. पण तिच्या येण्याच्या आतुरतेने वाढ पहात आहे. मला तिचा सार्थ अभिमान आहे. लहानपणापासून ती धाडसी आणि दृढनिश्चयी होती. तिला सुरवातीलपासून खेळात कमालीचा रस होता. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. या शिवाय राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये दोन ब्राँझ पदके जिंकली आहेत. (Chhonzin Angmo)