Carse Injury : ब्रायडन कार्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

Carse Injury

Carse Injury

लाहोर : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स हा चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली असून त्याला विश्रांती देण्याचा निर्णय इंग्लंड संघाने घेतला आहे. (Carse Injury)

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत-इंग्लंड वन-डे मालिकेदरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला टाके घालण्यात आल्यामुळे या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता. त्यानंतरही चॅम्पियन्स ट्रॉफीतील इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी त्याला अंतिम संघात स्थान देण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलेल्या या सामन्यात कार्स चांगलाच महागडा ठरला होता. त्याच्या ७ षटकात ६९ धावा वसूल करण्यात आल्या व त्याला केवळ एक विकेट मिळवण्यात यश आले. तो दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यामुळे इंग्लंड संघव्यवस्थापनाकडून आयसीसीकडे बदली खेळाडूची मागणी करण्यात आली. आयसीसीने मंगळवारी याला मान्यता दिल्यानंतर कार्सच्या जागी लेगस्पिनर रेहान अहमदचा इंग्लंड संघामध्ये समावेश करण्यात आला. (Carse Injury)

इंग्लंड संघाकडून फिरकीपटू आदिल रशीद आणि अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टन हे दोघे लेगस्पिनर अंतिम संघात खेळत आहेत. अहमद हा इंग्लंडच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघासोबत दाखल होऊ शकणार नसल्याने या सामन्यात जेमी ओव्हर्टनची अंतिम संघात निवड होण्याची शक्यता आहे. ओव्हर्टनशिवाय साकिब महमूद आणि गस ॲटकिन्सन या वेगवान गोलंदाजांचे पर्यायही इंग्लंडकडे आहेत. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना आता उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी साखळीतील उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. इंग्लंड-अफगाणिस्तान सामना २६ फेब्रुवारीला, तर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामना १ मार्च रोजी रंगणार आहे. (Carse Injury)

दरम्यान, या दुखापतीमुळे कार्सच्या पुढील महिन्यात रंगणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्याविषयीही प्रश्नचिन्ह आहे. आयपीएलच्या २०२५ च्या मोसमासाठी झालेल्या लिलावामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने कार्सला १ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.

हेही वाचा :

नेदरलँड्सची भारतावर मात

न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय

Related posts

Topate

Topate : काँग्रेसमध्ये निष्ठेचे फळ मिळाले नाही

Hindi optional

Hindi optional: हिंदी सक्तीबाबत सरकार बॅकफूटवर!

Bumrah, Mandhana

Bumrah, Mandhana : बुमराह, मानधनाचा सन्मान