Captain Gill’s century : भारताचा डावाचा डोंगर ; कर्णधार गिलचे दहावे शतक

Captain Gill's century

नवी दिल्ली : प्रतिनिधी : कर्णधार शुभमन गिल शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभारताना ५ बाद ५१८ धावांवर पहिला डाव जाहीर केला. गिलचे हे कारकीर्दीतील दहावे शतक असून यंदाच्या वर्षी त्याचे पाचवे शतक झळकावले. भारताच्या धावांचा पाठलाग करताना दिवसअखेर ४ बाद १४० धावा केल्या आहेत. शाई होप ३१ तर टेविन इमलाच १४ धावांवर खेळत आहेत. डावखुरा गोलंदाज रवींद्र जडेजाने तीन गडी बाद केले. (Captain Gill’s century)  

अरुण जेटली स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी शतकवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने डाव सुरू केला. जयस्वाल द्विशतक मारणार का असे वाटत असतानाच कालच्या धावसंख्येत दोन धावांची भर घालून तो धावबाद झाला. गिलच्या चुकीच्या कॉलमुळे मिडऑफवर एक धाव घेण्याचा प्रयत्न असताना तो बाद झाला. (Captain Gill’s century) 

जयस्वाल बाद झाल्यानंतर गिलने सयंमी खेळ करत नितिश कुमार रेड्डी सोबत ९१ धावांची भागिदारी केली. त्यांची जोडी जोमेल वॉरिकनने फोडली. नितिशने ४३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरेल आणि गिलने जलद धावा करण्यास सुरुवात केली. उपाहारानंतर दोघांच्या फलंदाजीला जोर आला होता. पण जुरेल ४४ धावांवर बाद झाला. गिल आणि जुरेलने १०२ धावांची शतकी भागिदारी केली. (Captain Gill’s century) 

त्यानंतर शतकाच्या समीप पोचलेल्या गिलने खारी पियरेच्या गोलंदाजीवर तीन धावा करुन शतक साजरे केले. त्याने १६ चौकार आणि दोन षटकार खेचले. गिलचे हे दहावे शतक होते. शतकानंतर कर्णधार गिलने ५ बाद ५१८ धावांवर डाव घोषीत केला.

वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. टॅगेनरीन चंद्रपॉल आणि अलिक नथानाझेने अनुक्रमे ३४ आणि ४१ धावा केल्या. फिरकीचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. जडेजाच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये के.एल.राहूलकडे झेल देत चंदरपॉल तंबूत परतला. त्यानंतर कुलदीप यादवने अथानाझला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जडेजाने रोस्टन चेसला भोपळाही फोडू दिला नाही. होप विरुद्धचे पायचित अपिल पंचांनी फेटाळले. जडेजाच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनशने फॉरवर्ड शॉर्ट लेगवर जॉन कॅम्पबेलचा सुंदर झेल पकडला. त्याने दहा धावा केल्या. (Captain Gill’s century) 

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय