बेळगावात कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा

बेळगाव : येथील कॅपिटल वन संस्थेतर्फे सातत्याने १२ व्या वर्षी  आंतरराज्य एकांकिका व आंतरशालेय (बेळगाव जिल्हा मर्यादित) अशा दोन गटांत एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी केले आहे.

स्पर्धा शनिवार ४ जानेवारी २०२५ व रविवार ५ जानेवारी असे दोन दिवस होणार आहेत. बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे स्पर्धा होती. स्पर्धेसाठी आवश्यक असणारा प्रवेश अर्ज हा संस्थेच्या सर्व शाखांसह संकेतस्थळावरून घेता येईल. २० डिसेंबर २०२४ ही प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक स्पर्धक संघांनी ९३ ४३ ६४ ९० ०६  या मोबाइल नंबरवर अथवा  capitalone.in@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

आजवर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तिन्ही राज्यांतून शेकडो दर्जेदार नाट्यसंघांनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेचा दर्जा, परीक्षण व आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे हंडे यांनी सांगितले.

आपल्या परिसरातून नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, लेखक निर्माण व्हावेत या उद्देशाने आंतरशालेय एकांकिका स्पर्धेची सुरुवात झाली.  यामुळे युवावर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊन नाट्यप्रपंचास भक्कम अशी उभारी मिळविण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही हंडे यांनी व्यक्त केला.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी