शेअर बाजारातील घसरणीच्या दुष्टचक्राला ब्रेक

मुंबई : सेन्सेक्सने एक हजार अंकांच्या वाढीसह सात सत्रातील तोट्याचा सिलसिला तोडला. बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी जोरदार उसळी घेतली. सकाळी ११.३६ वाजता सेन्सेक्स १०४४.८९ अंकांनी ७८,३८३.९० वर होता, तर एनएसई निफ्टी ३,७५८.३० वर होता.

परकीय गुंतवणूकदारांनी कमी केलेल्या विक्रीच्या अहवालानंतर अस्थिरता कमी झाल्याने व्यापक बाजार निर्देशांकांमध्येही मजबूत वाढ दिसून आली. चढ-उतार असूनही विश्लेषक सावध करतात, की वाढ तात्पुरती असू शकते. तत्पूर्वी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ब्लू-चिप समभागांमध्ये खालच्या पातळीवर खरेदी आणि मजबुतीमुळे मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. मजबूत जागतिक ट्रेंड आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सततच्या खरेदीमुळे बाजारातील सकारात्मक भावना निर्माण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स ५९१.१९ अंकांनी वाढून ७७,९३०.२० वर पोहोचला, तर एनएसईचा निफ्टी १८८.५ अंकांनी वाढून २३,६४२.३० अंकांवर पोहोचला. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स ८०० अंकांच्या पुढे व्यवहार करताना दिसला, तर निफ्टीने २३७०० ची पातळी ओलांडली.

महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्टस्‌ आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वाढले. सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्टस्, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. बजाज फिनसर्व्ह आणि कोटक महिंद्रा बँक मागे राहिले. एक्स्चेंज डेटानुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,४०३.४० कोटी रुपयांचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,३३०.५६ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. जागतिक बाजारातही सकारात्मक कल दिसून आला. आशियाई बाजारात सेऊल, टोकियो आणि हाँगकाँगमध्ये वाढ, तर शांघायमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सोमवारी, अमेरिकन बाजार मुख्यतः वाढीसह बंद झाले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.२६ टक्क्यांनी वाढून ७३.४९ डॉलर प्रतिपिंप झाले.

Related posts

stock market collapsed भारतीय शेअर बाजाराला झटका

गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम

म्युच्युअल फंड