Black magic : पंचगंगा घाटावर ‘भुलभुलेय्या’

Black magic

कोल्हापूर : प्रतिनिधी : पंचगंगा घाटावर भूतबाधा काढण्याचा प्रकार सोमवारी (दि.९) रात्री घडला. जागरुक नागरिकांनी या प्रकरणाबद्दल जाब विचारल्यावर मांत्रिक भोंदू बाबाने पलायन केले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रदर्शित झाल्यावर कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. (Black magic)

पंचगंगा नदीवर प्रत्येक सोमवारी श्रद्धाळू भाविक नदीची पूजा करुन परडी सोडण्याचा विधी करतात. परडी सोडण्यासाठी घाटावर गर्दी असते. काही मंडळी परडी सोडल्यानंतर मासांहारी जेवण नदीवर तयार करुन प्रसाद म्हणून खातात. परडी सोडण्याच्या विधीच्या वेळी महिलांना सहभागी करुन घेतले जात नाही. पण काल नदीवर परडी सोडण्याच्या नावाखाली महिलेची भूतबाधा काढण्याचा प्रकार उघडकीस आला. एक मांत्रिक महिलेचे भूत काढण्याचा विधी करत होता. काही जणांनी त्याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रणही केले. महिलेच्या अंगात संचार आल्यावर ती ओरडू लागली. हा भयानक प्रकार पाहून काही जागरुक नागरिकांनी मांत्रिक आणि महिलेच्या नातेवाईकांना जाब विचारल्यावर त्यांनी घाटावरुन पोबारा केला. (Black magic)

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की,  कोल्हापुरातील पंचगंगा घाट येथे रात्री दहा ते अकराच्या दरम्यान पाच ते सहा पुरुष आणि एक महिला पंचगंगा घाट परिसरात आले. त्यानंतर मांत्रिकही घाटावर पोहोचला. मांत्रिकाने भूत काढण्याचे विधी सुरू केले.  अचानक आरडाओरड सुरू झाली. महिला झपाटलेली असल्याचा म्हणत त्या मांत्रिकाने तिला जोरजोरात ओरडायला लावले.  तिच्या अंगावर फुंकर मारली, काही विचित्र हातवारे केले. यावेळी परडी सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मांत्रिक आणि महिलेचा आवाज एकून  घटनास्थळी पोहोचले.  त्यातील एका व्यक्तीने हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद केला. दरम्यान प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं मांत्रिकाला जाब विचारण्यास गेल्यानंतर घाबरून मांत्रिक तेथून पळून गेला. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (Black magic)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक