नसरापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Bhimrao Kamble sentenced to death

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर लैंगिक अत्याचारातील दोषी आरोपी भीमराव कांबळे या ६५ वर्षीय वृद्धाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली. आरोपींने अतिशय थंड डोक्याने गुन्हा केला आहे असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. (Bhimrao Kamble sentenced to death)

या खटल्याची माहिती अशी की, १ मे २०२६ रोजी नसरापूर साडेतीन वर्षाची मुलगी संध्याकाळी बेपत्ता झाली होती. रात्री तिचा मृतदेह सापडला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याची माहिती पुढे आले. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली. पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास करत सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित भीमराव कांबळे याला अटक केली. (Bhimrao Kamble sentenced to death)

गुन्हा घडल्यानंतर १६ मे रोजी पोलिसांनी जलदगतीने तपास करत १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. २८ मे रोजी न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करुन जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू केली. सरकारी पक्षाने वैज्ञानिक पुरावे मांडले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आणि त्यांची उलटतपासणी करण्यात आली. २५ जूनला कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले. आज सोमवारी त्याला फाशीची शिक्षा सुनावली.  (Bhimrao Kamble sentenced to death)

Related posts

लोकसभेत शेवटच्या दिवशी मोदी, शाहांची पाचच मिनिटे उपस्थिती

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा