सांगली : प्रतिनिधी : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला. भटक्या कुत्र्यांना त्यांच्या पायाचा लचका तोडला. त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. (Bhide guruji)
मिळालेल्या माहितीनुसार शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे धारकऱ्यांसमवेत सांगली शहरात फिरती करत होते. सोमवारी रात्री माळी गल्ली परिसरातील एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यावर ते धारकऱ्यांसमवेत चर्चा करत होते. चर्चा आटपून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते घराकडे निघाले. त्याचवेळी रस्त्यांवरील एका भटक्या कुत्र्यांने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रतिकार करण्यापूर्वी कुत्र्यांने भिडे गुरुजींच्या त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. सोबत असलेल्या धारकरांनी कुत्र्याला पिटाळून लावले. कुत्र्याच्या चाव्यामुळे त्यांच्या पायात रक्त आले. त्यानंतर त्यांना ताबडतोब सरकारी रुग्णालयात उपचारास दाखल केले. (Bhide guruji)
शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून भिडे गुरुजी शिवरायांच्या इतिहासात तरुणाईला माहिती देतात. काही दिवसापूर्वी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी पाडू नये असे मत् व्यक्त केले होते. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. या मुदद्यावर भिडे गुरुजींनी मत व्यक्त केले. संभाजीराजे बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती सत्य कथा आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी मारली हे सत्य आहे. त्यामुळे तिथे स्मारक केले आहे, असे भिडे गुरुजींचे म्हणणे आहे. (Bhide guruji)
हेही वाचा :