दोन अस्वलांचा शेतकरी दाम्पत्यावर हल्ला, शेतकरी गंभीर

बेळगाव : शेतात काम करत असलेल्या शेतकरी जोडाप्यावर दोन अस्वलांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमींपैकी शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. खानापूर तालुक्यातील माण गावातील शिवारात ही घटना घडली.

अस्वलांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी पती-पत्नी काम करत असताना दोन अस्वले शेतात आली. त्यांनी पती-पत्नीवर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखून शेतकऱ्याच्या पत्नीने पळ काढून आरडा-ओरड करून लोकांना बोलावले. अस्वलांनी शेतकऱ्याच्या पायाचे लचके तोडले. तर, पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. सखाराम महादेव गावकर (६३) असे अस्वलांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जखमी शेतकऱ्याला बेळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी