Banu Mushtaq : बानू यांना म्हैसूर दसरा महोत्सवाचे निमंत्रण; कन्नड साहित्यिकांत दुफळी

Banu Mushtaq

हुबळी : म्हैसूरच्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या साहित्यिक बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून कन्नड साहित्य जगतात दुफळी निर्माण झाली आहे. (Banu Mushtaq)

काही लेखकांच्या मते, सरकारचा हा निर्णय बानू यांनी गेल्या दशकांपासून कन्नड साहित्यात दिलेल्या योगदानाचा सन्मानच आहे.

तथापि, काहींचे म्हणणे आहे की सरकारने दीपा भस्ती यांना आमंत्रण देऊन वाद टाळला असता. बानू यांच्या लघुकथांच्या भस्ती यांनी केलेल्या ‘हार्ट लॅम्प’ या अनुवादामुळे या कामाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. दुर्लक्षित केलेल्या भाषांतराच्या कलेचीही दखल घेतली असती, असे त्यांना वाटते. (Banu Mushtaq)

अशा कार्यक्रमावेळी वैचारिक मुद्दे बाजूला ठेवावेत. बानू यांचे ‘‘नादा हब्बा’’ चे उदघाटन करण्यासाठी स्वागत केले पाहिजे कारण त्यांनी त्यांच्या कामाद्वारे कन्नडला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे, असे मत कन्नड कवी बी. आर. लक्ष्मण राव यांनी व्यक्त केले आहे.

‘‘दसरा सोहळ्याच्या उदघाटनासाठी बानू यांना आमंत्रित करून, कर्नाटक कन्नड भाषेला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणल्याबद्दल तिचा सन्मान करत आहे. तथापि, ज्यांच्या अनुवादाच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली त्या दीपा भस्ती यांनाही राज्य सरकारने आमंत्रित केले असते तर बरे झाले असते, ’’ असे ते म्हणाले. (Banu Mushtaq)

दीपा यांनाही दसरा सोहळासाठी आमंत्रित करायला हवे होते कारण त्यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार जिंकला आहे, महिला लेखकांमध्येही असा जोरदार युक्तिवाद आहे.

लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ वीणा शांतेश्वर म्हणतात की, बानू निश्चितच एक महान लेखिका आहेत, पण दीपाचे भाषांतर तितकेच महत्त्वाचे होते. म्हणून दसरा कार्यक्रमासाठी दोघांनाही आमंत्रित करणे योग्य आहे, असे त्या म्हणाल्या.

‘‘बुकर पुरस्कारानंतर बानूंना मान्यता मिळाली. बानू दीपाला कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी त्यांच्यासोबत येण्यास सांगू शकल्या असत्या,’’ असे मत आणखी एका लेखिकेने व्यक्त केले.

लेखक विवेक शानभाग म्हणाले, ‘‘केवळ बुकर मिळाला म्हणून नव्हे; तर बानू यांना कन्नड साहित्यातील त्यांच्या दशकांच्या योगदानाबद्दल दसरा उत्सवाच्या उदघाटनासाठी बोलावण्यात आले आहे.’’

‘‘बुकर ही त्यांच्या अनेक कामगिरींपैकी एक आहे. बानू स्वतः एक लेखिका आहेत,’’ असे ते म्हणाले.

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या