भिलाई (छत्तीसगढ) : राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी (१८ जुलै) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना अटक केली. (Baghel arrested)
केंद्रीय एजन्सीने ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या भिलाई येथील निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली.
अटकेनंतर, बघेल यांनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे अटकेच्या कारवाईला दुजोरा दिला. त्यांच्या मुलाला ‘वाढदिवसाची भेटवस्तू’ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आभार’ त्यांनी या पोस्टमध्ये मानले आहेत. (Baghel arrested)
‘‘मोदी आणि शाह ज्या प्रकारच्या वाढदिवसाच्या भेटवस्तू देतात ते जगातील कोणत्याही लोकशाहीत कोणीही देऊ शकत नाही. माझ्या वाढदिवसाला, दोन्ही आदरणीय नेत्यांनी माझ्या सल्लागाराच्या आणि दोन ओएसडींच्या घरी ईडी पाठवले.’’
‘‘आणि आता, माझा मुलगा चैतन्यच्या वाढदिवशी, अंमलबजावणी संचालनालयाची टीम माझ्या घरावर छापा टाकत आहे. या भेटवस्तूंसाठी धन्यवाद. मी त्या आयुष्यभर लक्षात ठेवेन,’’ असे ते म्हणाले. (Baghel arrested)
छापांनंतर, भूपेश बघेल यांचे कार्यालयानेही एक्सवर पोस्ट केली आहे. ‘‘आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तमनारमध्ये अदानीसाठी झाडे तोडल्याचा मुद्दा आज उपस्थित होणार होता. तोपर्यंत ‘साहेबां’’नी यांनी ईडीला भिलाईच्या निवासस्थानी पाठवले आहे,’’ असे यात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
- सरकारी अधिकारी, राजकारणी आणि दारू व्यावसायिकांचा समावेश असलेल्या एका कार्टेलने २०१९ ते २०२२ दरम्यान छत्तीसगडमध्ये दारू विक्रीतून सुमारे २,१६१ कोटी रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले, असा आरोप ईडीने केला आहे.
- कथित घोटाळ्यात दारू पुरवठा साखळीत फेरफार करण्यात आला होता, कार्टेल सरकारी दुकानांद्वारे दारूची विक्री आणि वितरण नियंत्रित करत होता. (Baghel arrested)
- विक्री केलेल्या दारूचा काही भाग अधिकृत खात्यात नोंदवला गेला नव्हता आणि कायदेशीर व्यवस्थेबाहेर त्याची विक्री करण्यास परवानगी देण्यासाठी पुरवठादारांकडून लाच घेण्यात आल्याचा आरोप आहे.
- ही चौकशी आयकर विभागाच्या पूर्वीच्या अहवालावर आधारित आहे. यामध्ये राज्यातील दारू व्यापारात अनियमितता उघडकीस आली होती.
- यापूर्वी, ईडीने आयएएस अधिकारी अनिल तुतेजा आणि रायपूरच्या महापौरांचे भाऊ, दारू व्यावसायिक अन्वर ढेबर यांच्यासह अनेक प्रमुख आरोपींना अटक केली होती.
- एजन्सीने छत्तीसगडमधील माजी काँग्रेस-नेतृत्वाखालील सरकारशी संबंधित राजकारणी आणि नोकरशहांवर अनेक छापे टाकले आहेत.