Bads of Bollywood row: ‘रेड चिलीज’विरोधात वानखेडेंचा मानहानीचा खटला

Bads of Bollywood row

नवी दिल्ली : अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक आणि भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. (Bads of Bollywood row) बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या मालकीची ही निर्मिती कंपनी आहे.

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पदार्पणाच्या मालिकेशी संबंधित आहे. या मालिकेत त्यांची प्रतिष्ठा खराब केल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.

या मालिकेला कायमस्वरुपी मनाई द्यावी तसेच आपल्याला नुकसानभरपाईही द्यावी, अशी मागणी केली आहे. (Bads of Bollywood row)

‘‘ही मालिका अमली पदार्थ विरोधी अंमलबजावणी संस्थांबाबत दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण करते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो,’’ असे वानखेडे यांनी म्हटले आहे. (Bads of Bollywood row)
ही मालिका ‘‘समीर वानखेडे यांची प्रतिमा भडक आणि पूर्वग्रहदूषित पद्धतीने खराब करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून संकल्पित केलेली आहे,’’ विशेषतः जेव्हा त्यांच्या आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित खटले अजूनही मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात सुरू आहेत, अशावेळी ही मालिका तयार करण्यात आली आहे, असा दावा वानखेडे यांनी केला आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?