कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीस पदी अशोक पोवार   

Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh

कोल्हापूर  : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या  सरचिटणीस पदी अशोक बळीराम पोवार यांची निवड झाली. कार्यालयीन सचिवपदी संभाजी  पाटील (कोपार्डे )यांचीही एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत  तालीम संघाचे अध्यक्ष व्ही . बी .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. माजी महापौर  महादेवराव आडगुळे यांनी सरचिटणीस पदाचा व यशवंतराव मुंडले यांनी कार्यालयीन सचिव पदाचा राजीनामा दिल्याने विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या. (Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh)

अशोक पोवार यांचे नाव महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी सुचविल्यावर एकमताने निवड करण्यात आली. यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच.  पाटील, विष्णू जोशीलकर,  माजी महापौर आर. के. पोवार , माणिक मंडलिक यांनी  मनोगत व्यक्त केले. (Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh)

बैठकीला हिंदकेसरी विनोद चौगुले,  संभाजी वरुटे , महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे , गुंडाजी पाटील ,उपाध्यक्ष प्रकाश खोत. प्रदिप गायकवाड, अमृता भोसले  सरदार पाटील, अशोक माने, मारुतीराव कातवरे, जयकुमार शिंदे,  बटू जाधव, सरदार वरुटे,  वस्ताद विश्वास हारूगले,  सागर चौगले पै बाळासो मेटकर ,राजाराम चौगुले ,विलास पाटील बापू लोखंडे श्रीकांत भोसले सिकंदर कांबळे आर्दीसह जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. (Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर