काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती केली  आहे. विदर्भासाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस. सिंगदेव आणि एम. बी. पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (Congress)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केले आहे.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ