Akhilesh’s crititic: सर्वांत मोठ्या पक्षाला अध्यक्ष निवडता आलेला नाही

Akhilesh’s crititic

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा असल्याचा दावा करणाऱ्यांना अद्याप आपल्या पक्षाचा अध्यक्ष निवडता आलेला नाही, असा टोला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला.(Akhilesh’s crititic)

वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान यादव बोलत होते. यादव यांच्या या टिपणीवरून लोकसभेत शाब्दिक युद्ध सुरू झाले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी यादव यांच्या या टिपणीला आक्षेप घेत काही वेळ घोषणाबाजी केली.

यादव हसत हसत म्हणाले, “जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारा पक्ष अजूनही स्वतःचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकलेला नाही.” (Akhilesh’s crititic)

त्यावर, “अखिलेशजींनी हसतमुखाने आपले मत मांडले. म्हणून मीही त्याच पद्धतीने उत्तर देईन. या सभागृहात आपल्या विरुद्ध बसलेल्या सर्व पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष फक्त पाच कुटुंबातील सदस्यांमधून निवडले जातात. परंतु आपल्या पक्षात आपल्याला १२-१३ कोटी सदस्यांचा समावेश असलेली प्रक्रिया राबवावी लागते. त्यामुळे स्वाभाविकच, वेळ लागतो. तुमच्या पक्षात अजिबात विलंब होत नाही,” असे शाह यांनी हसत हसतच प्रत्युत्तर दिले. (Akhilesh’s crititic)

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर १७ जून २०१९ रोजी जेपी नड्डा यांची भाजपचे कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते २० जानेवारी २०२० पर्यंत अध्यक्ष होते. २० जानेवारी २०२० रोजी, नड्डा यांची औपचारिकपणे पक्षाचे ११ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते हे पद भूषवत आहेत.

हेही वाचा :
‘कुंभ’मधील मृत्यू लपविण्यासाठी वक्फ विधेयक
इतिहास भाजपपेक्षा नितीश कुमारना जास्त दोषी ठरवेल

Related posts

Rana extradited: राणाचे प्रत्यार्पण

Rape accused granted bail: बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार

Olympics Cricket : सहा संघांमध्ये रंगणार ऑलिंपिक क्रिकेट