Ajit Pawar clarifies: अजित पवार महिला आयपीएस अधिकाऱ्याबद्दल म्हणाले…

Ajit Pawar clarifies

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून फटकारतानाच्या कथित व्हायरल व्हिडिओवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Ajit Pawar clarifies)

या राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला माणूस बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा द्या म्हणून आयपीएस अधिकाऱ्याला सांगत आहे. एका तरूण महिला आयपीएस अधिकाऱ्याला मी सांगतोय ते कर, असे सांगत आहेत. तुम्ही सर्व चोरांचे सरदार आहात, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आता खुद्द अजित पवार यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. यासंबंधीची पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. (Ajit Pawar clarifies)

आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.

मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.

सोलापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून फटकारल्याचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. (Ajit Pawar clarifies)

अंजली कृष्णा बेकायदा मुरुम उत्खननात सहभागी असलेल्या गुंडांवर कारवाई करत होत्या आणि पवार त्यांना असे न करण्याचे आदेश देत होते असे म्हटले जात आहे.

“तुम्ही कारवाई थांबवा आणि तुमच्या कार्यालयात परत जा. तहसीलदारांना सांगा की उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई थांबवण्यात आली आहे,” असे व्हायरल व्हिडिओमध्ये फोनवर ते (अजित पवार) सांगताना ऐकू येते. दरम्यान, एकतर अजित पवारांची तशी शैली आहे. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यामुळे अशा आवाजात बोलले म्हणजे ते ओरडत आहेत असं जर कुणी म्हणत असेल, तर गेल्या ४० वर्षांत अजित पवार कुणाला कळले नाहीत असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर