गॉडझिला चित्रपटाची १९ वर्षीय कर्णबधिर अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

Actress Kayli Hotel died in an accident

न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट गॉडझिला वर्सेस काँग, आणि गॉडझिला एस काँग ; द न्यू एम्पायर या लोकप्रिय चित्रपटातील अभिनेत्री कायली हॉटल हीचे वयाच्या १९ वर्षी भीषण अपघातात मृत्यू झाला. ती कर्णबधिर असूनही तिच्या अभिनयाची वाहवा झाली. तिच्या निधनाने हॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. (Actress Kayli Hotel died in an accident)

अमेरिकेतील मेरीलँड राज्यातल फ्रेडरिक येथे २१ जुलै रोजी पहाटे कारचा अपघात झाला. कार रस्त्यांवरुन घसरुन झालेल्या अपघातात हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचे हृदय बंद पडून  मृत्यू झाला. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत. तिच्या निधनाची माहिती तिचे वडील ‘जोशुआ हॉटल’ यांनी अमेरिकन साईन लँग्वेजचा (ASL) वापर करून फेसबुक लाईव्हद्वारे जगाला दिली.

कायलीचा जन्म  एक मे २००७ मध्ये अटलांटा, जॉर्जियामध्ये झाला. ती जन्मापासून कर्णबधीर होती. तिचे कुटुंबिय कर्णबधीर होते. पडद्यावर कर्णबधिर व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांमध्ये तिचे योगदान मोठे होते. (Actress Kayli Hotel died in an accident)

कायलीच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गॉडझिला वर्सेस काँग चित्रपटात तिने जिया ही व्यक्तीरेखा साकारली होती.  तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. कायलिने जिया नावाच्या कर्णबधीर मुलीची भूमिका केली होती. तिने साकारलेली ‘जिया’ ही एक कर्णबधिर मुलगी होती.  जी ‘काँग’ या महाकाय प्राण्याशी अमेरिकन सांकेतिक भाषेच्या (ASL) माध्यमातून संवाद साधत असे. तिचा हा अभिनय अत्यंत गाजला होता. कायलीने सांकेतिक भाषेच्या माध्यमातून आपली भूमिका उठावदार केली होती. गॉडझिला चित्रपटामुळे ती जगप्रसिद्ध झाली होती.  गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ मधील उत्कृष्ट अभिनयासाठी तिला ‘सॅटर्न अवॉर्ड्स’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट युवा कलाकार’ या श्रेणीत नामांकन मिळाले होते. (Actress Kayli Hotel died in an accident)

Related posts

विजयाबाईः हयात असलेल्या आणि नसलेल्या

राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार : आशिष शेलार

चलो इक बार फिर से…