Acharya Devvrat : गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार

Acharya Devvrat

मुंबई : विशेष प्रतिनिधी : उपराष्ट्रपती नियुक्ती झालेल्या सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. (Acharya Devvrat)

राष्ट्रपती भवनाने गुरुवारी (११ सप्टेंबर) त्याबाबतचे निवेदन जारी केले. देवव्रत यांना दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Acharya Devvrat)

जगदीप धनकवड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सत्तारुढ एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन बहुमताने विजयी झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देवव्रत यांच्याकडे देण्यात आला आहे. या पदावर पूर्णवेळ नियुक्ती होईपर्यंत ते महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल म्हणून काम पाहतील. (Acharya Devvrat)

कोण आहेत आचार्य देवव्रत?
आचार्य देवव्रत यांचा जन्म १८ जानेवारी १९५९ रोजी हरियाणातील समालखा येथे झाला. त्यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलात प्राचार्य म्हणून पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धतीचा प्रसार केला. ऑगस्ट २०१५ ते जुलै २०१९ या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केले, तर जून २०१९ पासून ते गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. आर्य समाजाचे प्रचारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य देवव्रत यांनी सामाजिक सुधारणा, गोसंरक्षण आणि पर्यावरण जागृतीसाठी विशेष योगदान दिले आहे.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग