गुजरातमध्ये जमीन खचल्याने ७ मजुरांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  गुजरातमधील जसलपूर (ता.कादी, जि. मेहसाणा) गावाजवळ बांधकामाच्या ठिकाणी जमीन खचल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही ४ ते ५ मजूर अडकल्याची शक्यता आहे. रेक्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. (Gujarat News)

उपलब्ध माहितीनुसार येथे फॅक्टरीसाठी अंडरग्राऊंड टँक बसवण्याचे काम सुरू होते. यादरम्यान अचानक माती खचल्याने काम करत असलेले मजूर त्याखाली गाडले गेले. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील कादी तालुक्यातील जसलपूर गावाजवळ एका खासगी कंपनीची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मेहसाणाचे एसपी तरुण दुग्गल यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना