भाजपला २६०० कोटी तर, काँग्रेसला २८१ कोटींची देणगी

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. २०२३-२०२४ या वर्षांत भाजपला २६०४.७४ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. तर काँग्रेस पक्षाला २८१.३८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली होती. (Election Commission of India)

पाच वर्षांपूर्वी भाजपला ७४० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. पाच वर्षानंतर भाजपच्या देणगीत भरघोस वाढ झाली. त्यात तब्बल दोन हजार कोटी रुपयांची भर पडली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१८-२०१९ मध्ये काँग्रेसला १४६ कोटी रुपये मिळाले. गेल्या पाच वर्षात तुलनेत काँग्रेसच्या पदरात आणखी १३५ कोटी रुपये पडले आहेत.

सहा राष्ट्रीय पक्षांना ६३ टक्के मते

लोकसभा निवडणुकीत देशातील सहा राष्ट्रीय पक्षांना एकूण ६३ मते मिळाली आहेत. भाजप, काँग्रेस, बसपा, भाकप, माकप, आप आणि नॅशनल पीपल्स पार्टी या सहा पक्षांचा समावेश आहे. (Election Commission of India)

मतदानात महिला आघाडीवर

लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महिलांच्या मतदानाची आकडेवारी ६५.७८ तर पुरुष मतदारांची संख्या ६५.५५ टक्के इतकी आहे. महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत ८०० महिला उमेदवार तर २०१९ मध्ये ७२६ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

हेही वाचा :

Related posts

Manmohan Singh कर्मयोगी

Manmohan Singh मेणाहून मऊ, वज्राहून कठोर

Manmohan Singh भारतीय राजकारणातील सभ्यता निमाली