Women’s Singles : सबालेंका-कीज् विजेतेपदासाठी झुंजणार

Women’s Singles

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीचे प्रतिस्पर्धी गुरुवारी निश्चित झाले. आर्यना सबालेंका आणि मॅडिसन कीज् यांनी उपांत्य सामन्यांत विजय मिळवून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. अग्रमानांकित सबालेंका तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्न करेल, तर मॅडिसनने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. (Women’s Singles)

बेलारुसच्या सबालेंकाने उपांत्य सामन्यात स्पेनच्या ११व्या मानांकित पॉला बॅडोसावर अवघ्या १ तास २६ मिनिटांमध्ये ६-४, ६-२ अशी मात केली. मागील दोनवेळच्या विजेत्या असणाऱ्या सबालेंकाचा या स्पर्धेतील हा सलग २०वा विजय ठरला. पहिल्या सेटमध्ये बॅडोसाने थोडाफार प्रतिकार केला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सबालेंकाने तिला कोणतीही संधी दिली नाही. अंतिम फेरीत प्रवेश करेपर्यंत सबालेंकाने केवळ एक सेट गमावला आहे. (Women’s Singles)

महिला एकेरीचा दुसरा सामना चांगलाच चुरशीचा झाला. त्यामध्ये १९ व्या मानांकित अमेरिकेच्या मॅडिसनने द्वितीय मानांकित पोलंडच्या इगा स्वियातेकचा ५-७, ६-१, ७-६(१०-६) असा पराभव केला. हा सामना तब्बल २ तास ३५ मिनिटे रंगला. स्वियातेकने पहिला सेट जिंकून दमदार सुरुवात केली होती. मात्र, मॅडिसनने जोरदार पुनरागमन करताना दुसरा सेट ६-१ असा एकतर्फी जिंकत सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंनी तोडीस तोड खेळ केल्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये स्वियातेकवर १०-८ अशी मात करून मॅडिसनने विजयावर शिक्कामोर्तब केले. (Women’s Singles)

२९ वर्षीय मॅडिसनला कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आले. यापूर्वी, २०१७ मध्ये तिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तथापि, त्यावेळी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. (Women’s Singles)

हेही वाचा :
भारताचे दिग्गज रणजीमध्येही नापास

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय