मामीने मामाच्या खुनाची सुपारी का दिली?

पुणे; प्रतिनिधी : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ याच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिली असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. मामीचे भाडेकरुबरोबर असलेले प्रेमसंबध हे प्रम्ख कारण असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Satish Wagh)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या हत्येच्या तपासात त्यांची ४८ वर्षी मोहिनी वाघ यांना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांचे मोहीनी यांचे संबध हे हत्येमागचे प्रमुख कारण असल्याची माहिती पुढे आली आहे.

विधान परिषदेचे आमदार आणि भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील श्यामसुंदर शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास उर्फ विकी शिंदे, अक्षय उर्फ सोन्या जावळकर आणि अतिश जाधव यांना अटक केली होती. या संदर्भात अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. बलकवडे म्हणाले, ‘हत्येनंतर पहिल्या दहा दिवसात पुरावे गोळा करण्यात आले. पुराव्याच्या अनुषंगाने सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांनीच हत्येचा कट रचला होता. (Satish Wagh)

दरम्यान मोहिनी वाघ यांनी पतीच्या हत्येची सुपारी का दिली याची माहिती बलकवडे यांनी दिली. मोहिनी वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार पती सतीश वाघ रोज त्यांना मारहाण करत होते. पतीकडून होणारा त्रास हे खुनामागचे कारण होते. तसेच पतीचे आर्थिक व्यवहार स्वत:च्या हातात यावे हा हेतू मोहिनी वाघ यांचा होता. या प्रकरणात कसून चौकशी केली असता मोहिनी वाघ यांनी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अक्षय जावळकर यांच्यासोबात संबध असल्याची कबुली दिली. सतीश वाघ यांच्या हत्येमधील मुख्य कारण असल्याचे शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केले.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर हा वाघ यांच्याकडे १५ वर्षापासून भाडेकरु म्हणून रहात होता. २००१ ते २०१६ या काळात अक्षय जावळकरांच्या कुटुंबाचे वास्तव्य फुरसुंगी येथे होते. मात्र २०१६ त्याने घर सोडले आणि परिसरातील एका घरात भाड्याने रहायला सुरुवात केली. अक्षय जावळकरने मारेकऱ्यांना पाच लाख रुपये देण्याचे कबुल केले होते. यातील काही रक्कम पोलिसांनी जप्त केली. दरम्यान मोहिनी वाघ यांचा या आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचे पुरावे अजून पोलिसांच्या हाती लागले नसल्याचेही बलकवडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Related posts

‘सौर कृषी पंप योजने’त महाराष्ट्र अव्वल

‘सायकलिंग’मधील ‘जीवन गौरव’ प्रताप जाधव यांना

परभणी, बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न