नववर्षात व्हॉट्स अ‍ॅप होणार बंद!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : व्हॉट्स अ‍ॅप. जगतील प्रत्येक मोबाईलमध्ये असलेले अ‍ॅप्लिकेशन. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला व्हॉट्स अॅप मह्त्वाचे आहे. त्याच्या माध्यमातून लोक आपली कामे करतात. परंतु, मेटाने नियमात केलेल्या बदलांमुळे काही स्मार्ट फोनमध्ये काम करण बंद होणार आहे. याबाबत कंपनीने निवेदन जारी केले आहे. (WhatsApp)

नववर्षात मेटा काही नियामत बदल करणार आहे. त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२५ पासून होणार आहे. व्हॉट्स ॲप पेरेंट कंपनी ‘मेटा’ने याबाबत निवेदन जारी केले आहे.

व्हॉट्स ॲप १० वर्षांपूर्वीची ऑपरेटींग सिस्टम किंवा त्याहून जुन्या सिस्टम काम करणाऱ्या विविध स्मार्ट फोन सपोर्ट करणार नाही, अशी घोषणा मेटाने केली आहे. नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगतता निश्चित करण्यासह ॲपची सुरक्षा, कार्यक्षमता राखण्यासाठी नियमित अपडेट्सचा हा एक भाग असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

२०१३ मध्ये वापरतात असलेल्या ऑपरेटिंग सिस्टम वापराबाहेर गेल्या आहेत. याबद्दल कंपनीने सांगितले की, “अॅपवर अनेकदा नवीन अपडेट्सना सपोर्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांचा अभाव जाणवतो. त्यामुळे स्मार्ट फोनला सुरक्षा धोके निर्माण होतात. अशा स्मार्ट फोनना सपोर्ट बंद करणार असल्याचे देखील मेटाने म्हटले आहे. (WhatsApp)

‘या’ स्मार्टफोनमधील ‘WhatsApp’ होणार बंद

सॅमसंग (Samsung) : Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini
मोटोरोला (Motorola) : Moto G (1st Gen), Razr HD, Moto E 2014
एचटीसी (HTC) : One X, One X+, Desire 500, Desire 601
एलजी (LG) : Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90
सोनी (Sony) : Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V

हेही वाचा :

Related posts

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

police encounter : खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या तिघांचा एन्काउंटर

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा