महिलांची व्यवस्था ही कसली भाषा..? प्रणिती शिंदे

उजळाईवाडी : प्रतिनिधी : ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांचे फोटो काढून आम्हाला द्या, त्यांची व्यवस्था करतो, ही धनंजय महाडिक यांची कसली भाषा आहे ? पैशाने सन्मान मिळत नाही, आम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचे आहे. महिला सुरक्षेच्या योजना व्हाव्यात यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणूया, अशी साद खा. प्रणिती शिंदे यांनी घातली. त्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथे कोल्हापूर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ दुर्गाशक्ती महिला मेळाव्यात बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ऋतुराज यांच्यासारखा कार्यक्षम तरुण आमदार आपल्याला लाभला आहे. विधानसभेच्या लॉबीमध्येही कर्मचाऱ्यांची विचारपूस करणारा हा एकमेव आमदार असल्याचे कौतुकोद्‌गार शिदे यांनी काढले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मला घडवण्याचं काम जनतेने केलं आहे. त्यामुळे प्रत्येकाची सेवा करण्यात मी कुठेच कमी पडलो नाही. अनेक युवक-युवतीसाठी ४ कोटी रुपये खर्चुन अभ्यासिका तसेच खेळाचे मैदान निर्माण केले आहे. ३४४ कोटींचा पाण्याचा प्रकल्प, १३ गावांसाठी पाणी आणले, प्रत्येकाच्या घरात ६ तास पाणी येणार आहे. ‘मी दुर्गा’ हे अभियान राबविले, असे ते म्हणाले. सरपंच उत्तम आंबवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा बकेच्या संचालक स्मिता गवळी, अश्विनी शिरगावे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पूजा ऋतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, प्रतिभा पवार, सारिका माने, शुभांगी आडसूळ, संदीप माने, प्रतिभा पवार, सारिका माने, सोनाली मजगे, भाग्यश्री पारखे आदी उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी