भारताविरोधात वेस्ट इंडिज ४०० पार; तिघांची शतके

West Indies cross the 400-run mark against India

गुवाहाटी : यजमान भारताच्या विरोधात वेस्ट इंडिजने दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात गोलंदाजाची धुलाई करत ७ गडी गमावत ४०५ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडिजच्या जॉन कॅम्पबेल, शाई होप आणि अमीर जांगू या तिघांनी दणदणीत शतके ठोकत संघाचा विशाल धावफलक उभा केला. (West Indies cross the 400-run mark against India)

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत ७ गडी गमावत ४०५ धावा केल्या. एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सलामीवीरांनी १५ षटकात १३२ धावा चोपत वेस्ट इंडिज संघाला दमदार सलामी करुन दिली. १८ व्या षटकात सलामीवर जॉन कॅम्पबेलने ६५ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. त्याने ९ चौकार ५ षटकार ठोकले. २५.३ षटकात वेस्ट इंडिज संघाने २०० धावांचा टप्पा गाठला. (West Indies cross the 400-run mark against India)

कॅम्पबेल बाद झाल्यानंतर शाई होप आणि अमीर जांगू यांनी भारतीय संघाची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. शाई होपने ९० चेंडूत शतक ठोकत तो १०४ धावांवर बाद झाला. अमीर जांगून ७० चेंडूत तडाखेबाज शतक ठोकले. भारताविरोधात जांगूंचे दुसरे सर्वात जलद एकदिवशीय शतक ठरले. जांगूने ७७ चेंडूत १३ खणखणीत चौकार आणि ३ षटकार खेचत ११४ धावा केल्या.

वेस्ट इंडिज संघाच्या धावाचा पाठलाग करताना भारताने १४ षटकात १२१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ६९ तर शुभमन गिल ४७ धावांवर खेळत आहेत. (West Indies cross the 400-run mark against India)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव