कोल्हापूर : प्रतिनिधी : काळम्मावाडी पाणी उपसा केंद्रातील एक पंपात बिघाड झाल्याने ऐन गणेशोत्सवात कोल्हापूर शहरात सी आणि डी वॉर्ड वगळता दैना उडाली. तब्बल आठवडाभर शहरवासियांचे हाल झाल्यानंतर रविवारी ३१ पासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिंगणापूर पाणी योजनेतून ए आणि बी वॉर्डाला, बालिंगा योजनेतून सी व डी वॉर्डाला तर काळम्मावाडी योजनेतून ई वॉर्डाल पाणी पुरवठा होणार आहे. (Water supply in Kolhapur)
थेट पाईपलाइन काळम्मावाडी योजनेतील पाणी उपसा केंद्रातील एका पाणी उपसा करण्यात बिघाड झाल्याने शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. महानगरपालिकेने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करुन पाणी वितरणाची सर्व यंत्रणा कोलमोडली होती. पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. महिलासह अबाल वृद्ध रस्त्यांवर उतरले. तर दुसरीकडे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. (Water supply in Kolhapur)
काळम्मावाडी येथील एका पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाली होती त्यासाठी एबीबी कंपनीचा टेक्निकल इंजिनिअर शनिवारी दुपारी बारा वाजता काळम्मावाडी येथे दाखल झाला आहे. या इंजिनिअरद्वारे जो तांत्रिक दोष आहे त्याची तपासणी करुन कंपनीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील 33 केव्ही सब स्टेशन दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने आज शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ट्रॉन्सफॉर्मचे हिटींग करुन पंपिग स्टेशनची चाचणी घेण्यात आली. सायंकाळी सदरची चाचणी पूर्ण झाल्याने रात्रौ आठ वाजता तीन पंपाद्वारे शिंगणापूर येथून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे रविवार ३१ ऑगस्ट रोजी शिंगणापूर मधून ए, बी व ई वॉर्डमधील राजारामपूरी सेक्शन, बालिंगामधून सी व डी वॉर्डला व काळम्मावाडी योजनेमधून कसबा बावडा तसेच संलग्न ई वॉर्डाला एकाच वेळी दैनंदिन पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. (Water supply in Kolhapur)