अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘मविआ’ आमदारांचे ‘वॉक आऊट’

नागपूर; विशेष प्रतिनिधी : संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले. यावेळी  त्यांना बोलू न दिल्यामुळे आज (दि.१८) महाविकास आघाडीच्या आमदारांनी वॉक आऊट केले. (Amit Shah)

सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या उद्गारावर निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्ड वर यावे, यासाठी सभापती यांनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्री यांचे उद्गार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो. मग गृहमंत्री यांच्या उद्गाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही, असा सवाल करत दानवे यांनी निषेध व्यक्त केला.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

उद्धव-राज ठाकरे एकत्र