विनेश फोगाटने भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कुस्तीपटू व काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियानातील जुलाना विधानसभा मतदरासंघातून बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा ६०१५ मतांनी पराभव केला आहे. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विनेश फोगाट योगेश बैरागी यांच्यापेक्षा पिछाडीवर होती. पण पुढील सर्व मतमोजणीच्या फेरीत विनेश फोगाट आघाडीवर राहिली आणि विजयी झाली.   (Vinesh Phogat)

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर ६ सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट दिले होते.

विनेश फोगाट यांच्यामुळे ही लढत चुरशीची झाली होती.येथील जनतेने तिला पाठिंबा दिला असून एकूण ६५०८० मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी कॅप्टन सिंग वैरागी यांना ५९०६५ मतांवर समाधान मानावे लागले आणि ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी यांना केवळ १२८० मते मिळाली. (Vinesh Phogat)

विजयानंतर बजरंग पुनियाने केले अभिनंदन..

देशाची कन्या विनेश फोगाटला विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन….ही लढत केवळ एका जुलाना जागेसाठी नव्हती…केवळ पक्षांमधील लढत नव्हती…हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध होता. आणि यामध्ये विनेश फोगाट जिंकली, असं कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला.

हेही वाचा :

 

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!