सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘वेताळमाळ’ उपांत्य फेरीत; ‘बालगोपाल’ पराभूत

Vetalmal Enters Semifinals of Satej Cup Football Tournament

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळाने बालगोपाल तालीम मंडळावर १-० असा निसटता विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजीत ही स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Vetalmal Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)

वेताळमाळ आणि बालगोपाल यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण अचूक समन्वयाअभावी दोन्ही संघ गोल करु शकले नाहीत. त्यामुळे मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता.

उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी मिळवण्यासाठी इर्षेने मैदानात उतरले. त्यामध्ये वेताळमाळला यश आले. ४९ व्या मिनिटाला राहूल पाटीलने गोल करत संघास आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी बालगोपालने वेताळमाळच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. पण वेताळमाळने भक्कम बचाव ठेवत गोल चढू दिला नाही. पूर्ण वेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत वेताळमाळने सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोल नोंदवणाऱ्या राहूल पाटील याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. (Vetalmal Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)

शुक्रवारी दिलबहार तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात दुपारी चार वाजता सामना खेळवण्यात येणार आहे.

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय