V.R.Patil : जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी पाटील विजयी

V.R.Patil

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत सत्तारुढ पॅनेलने विजय मिळवला. पॅनेल प्रमुख व्ही. आर. पाटील अध्यक्षपदी विजयी झाले.  सत्तारुढ व्ही.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पंधरा पैकी नऊ जागा जिंकल्या. अॅड. आनंदराव जाधव पॅनेलला सहा जागा मिळाल्या. तर अॅड. सतीश कुणकेकर पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड व्ही. आर. पाटील ९७६ मते मिळवून विजय झाले.  त्यांनी अॅड. आनंदराव जाधव (७४० मते) व अॅड. सतीश कुणकेकर (५१४ मते) यांचा पराभव केला. (V.R.Patil)

 बार असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा तीन पॅनेल होती.  २९४० मतदारांपैकी २२४९ सभासद मतदारांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सुभाष पिसाळ यांनी काम पाहिले. निवडणूकीत अॅड. व्ही. आर. पाटील पॅनेलने पंधरापैकी नऊ जागा जिंकल्या. सत्तारुढ पॅनेलमधून उपाध्यक्षपदी तुकाराम शंकर पाडेकर यांनी ११३५ इतकी सर्वाधिक मते घेत विजयी ठरले. लोकल ऑडिटर प्रमोद प्रकाश दाभाडे यांना १०४४, महिला प्रतिनिधी गटात मनिषा हिम्मतराव सातपुते यांना ९३४, कार्यकारिणीमध्ये वैष्णवी विशाल कुलकर्णी यांना ९५८,  वैभव रावसाहेब पाटील यांना  १०८२,  मीना विद्यानंद पाटोळे यांना ९८५, सम्राज्ञी युवराज शेळके यांना १००९, प्रीतम श्रावण पातले यांना ९१७ मतांनी विजयी झाले. (V.R.Patil)

अॅड. आनंदराव भाऊसाहेब जाधव पॅनेलमधून सचिवपदाचे उमेदवार मनोज मोहन पाटील हे ९१३ मते घेत विजयी झाले. याच पॅनेलमधील  सहसचिवपदाचे उमेदवार सूरज राजकुमार भोसले यांना ८८४, कार्यकारिणी सदस्यांमध्ये स्वप्नील सुनील कराळे यांना ७२४, स्नेहल भीमराव गुरव यांना ९०३, हंसिका अजित जाधव यांना ९००, निखिल राजाराम मुदगल ८२० मते प्राप्त करत विजयी झाले. (V.R.Patil)

पराभूत उमेदवारांना मिळालेली मते अशी

उपाध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत उमेदवारांमध्ये  जाधव पॅनेलचे उमेदवार संदीप जाधव ७२८ मते, कुणकेकर पॅनेलच्या रेखा भोसले यांना ३७० मते मिळाली. सचिवपदाच्या लढतीत पराभूत उमेदवारांत पाटील पॅनेलचे अॅड. प्रशांत पाटील यांना  ८२५, कुणकेकर पॅनेलचे सुर्यदीप भोसले यांना ४९५ मते मिळाली. सहसचिवपदाच्या लढतीत पाटील पॅनेलचे उमेदवार  रोहन साळोखे यांना ७८४ मते, कुणकेकर पॅनेलचे उमेदवार अमोल नाईक यांना ५६० मते मिळाली. लोकल ऑडिटरपदाच्या लढतीत जाधव पॅनेलचे उमेदवार  धीरज शिंदे यांना ८०६, कुणकेकर पॅनेलचे उमेदवार परवेज पठाण यांना ३७५ मते मिळाली. महिला प्रतिनिधी गटातील लढतीत जाधव पॅनेलच्या उमेदवार स्वाती मोहिते यांना ७३५ मते, कुणकेकर पॅनेलच्या उमेदवार दीपा गुरव यांना ५५२ मते मिळाली. (V.R.Patil)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?