घरफोडीतील दोन संशयितांना अटक, पाच लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना पकडून त्यांच्याकडून अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. प्रमोद उर्फ पम्या वडर (वय २४, रा. वाळवेकरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) आणि किरण मारुती जाधव (३१ शिवाजीनगर, हुपरी) अशी दोघां संशयितांची नावे आहेत. दोघांनी हुपरी परिसरात घरफोडी केली होती.

पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना पकडले. त्यांच्याकडे ४१.२३० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४६६.६५० ग्रॅम  चांदीचे दागिने जप्त केले. दोघां संशयितांना पकडून हुपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, हवालदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, सतीश जंगम, अमित सर्जे, राजू कांबळे, महेंद्र कोरवी यांनी तपास केला.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी