ट्रक गर्दीत घुसवला; दहा जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : एका ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगाने आणला आणि गर्दीत घुसवला. या घटनेत किमान दहाजणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकबाहेर येऊन पळून जाण्याआधी ट्रकचालकाने गोळीबारही केला.  त्यावेळी पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत त्याचा खात्मा केला. ही घटना नवीन वर्षाच्या पहाटे घडली. नववर्षाच्या स्वागतासाठी या परिसरात मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. (America News)

सुरूवातीला हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात होते. तथापि, ‘एफबीआय’ने हा दहशतवादी हल्ला नसल्याचा निर्वाळा दिला आहे. बुधवारी (दि.१) पहाटे न्यू ऑर्लीन्सच्या फ्रेंच क्वार्टरमधील बोर्बन स्ट्रीटवर ही घटना घडली. या घटनेत सुमारे ३० जण जखमी झाल्याचे वृत्त एएफपीने  अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. शहराच्या महापौरांनी हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे म्हटले होते. मात्र लगेचच खुलासा करत एफबीआयने त्याचा इन्कार केला.

ड्रायव्हरने ट्रकमधून बाहेर पडण्यापूर्वी गोळीबार करण्यास सुरुवात केली, पोलिसांनी त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिले, असे ही घटना पाहणाऱ्या साक्षीदाराने सांगितले. (America News)

हेही वाचा :

Related posts

कच्च्या कैद्यांचे अंधकारमय भवितव्य

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये