ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे. (Dadasaheb Phalke Award )

मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट सृष्टीत अत्यंत मानाचा मानला समजला जातो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपट सृष्टीवर बराच काळ अधिराज्य केलं. त्यांच्या डिस्को डान्सचे चाहते देशासह परदेशातही आहेत. हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत संवाद शैली, नृत्य, अभिनयात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 17 व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी या पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तसेच तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात रामकृष्ण परमहंस या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

Dadasaheb Phalke Award : कलारसिकांच्या मनावर अधिराज्य केले : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटंल आहे की, ” आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व अनोख्या नृत्यशैलीने दोन पिढ्यांतील रसिक तरुणाईच्या मनावर गारुड घालणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये भूमिका साकारताना आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा आणि नृत्यशैलीचा ठसा उमटवून त्यांनी कलारसिकांच्या मनावर अधिराज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दलच्या या पुरस्काराचे मानकरी ठरलेले मिथुन चक्रवर्ती यांचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! मिथुन दा आपला भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवास भावी पिढयांना प्रेरणा देणारा आहे.”

हेही वाचा 

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड

Pushpa : The Rule – Part 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ