विधानसभेवेळी मतदार याद्यांबाबत कसलाही घोटाळा झालेला नाही

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ‘मतदारांची अनियंत्रित भर घातली किंवा मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून मतदारांना वगळले, असा प्रकार झालेला नाही, असे भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले. (Maharashtra Assembly)

काँग्रेसने मतदार याद्यांतून मोठ्या संख्येने वगळण्यात आले. तसेच मतदार याद्या अंतिम करताना प्रत्येक मतदार संघात १० हजारांवर मतदारांची नावे घुसडल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच मतदानाच्या दिवशी रात्री ११.३० वाजता निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अंतिम मतदार टक्केवारीत प्रचंड वाढ दाखवली होती. संध्याकाळी ५ वाजता जाहीर केलेल्या अंदाजे आकडेवारीचा विचार करता ही टक्केवारी अकल्पनीय होती, असा दावाही काँग्रेसे केला होता. त्यावर अंतिम आकडेवारीसोबत संध्याकाळी पाचच्या डेटाची तुलना करणे योग्य नाही. संध्याकाळी ५ ते ११.४५ पर्यंत मतदानाची वाढ सामान्य होती. मतदान आणि मतमोजणी आकडेवारीत अवास्तव फरक नाही, असे आयोगाने म्हटले आहे. (Maharashtra Assembly)

मतदान संपण्याच्या वेळी उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे मतदानाचा तपशील देणारा १७ सी फॉर्म मतदान केंद्रावरच दिलेला होता. त्यामुळे वास्तविक मतदारांचे प्रमाण बदलणे अशक्य असल्याचे निवडणूक मंडळाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Related posts

Shah Nadda : ‘इंडिया’च्या फेक नॅरेटिव्हविरोधात आघाडी उभारा

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ५० विकेट पूर्ण

plane crash अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले