नाट्यगृह मूळ स्वरूपात वेळेत उभारणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर संताप, दुख जनक्षोभ या भावना उमटल्या होत्या. या घटनेचे निराकरण कसे होणार याची चिंता व्यक्त केली जात होती. पण राज्यसरकारने नाट्यगृह उभारण्याचा निर्धार केला. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने रेकॉर्डब्रेक वेळेत निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण केले आणि आज पुर्नबांधणी भूमीपूजन आचारसंहितेपूर्वी झाले. नाट्यगृह उभारणीसाठी २५ कोटी रुपये मिळाले की एक हजार कोटी रुपये मिळाले हे महत्वाचे नाही तर कोल्हापूरकरांची भावना या इमारतीत गुंतली आहे. राज्य सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी, रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन काम केल्याने नाट्यगृहाचे शिवधनुष्य पेलले जाईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नाट्यगृह मूळ स्वरुपात वेळेत आणि दिमाखात उभे राहील, असेही ते म्हणाले. (Keshavrao Bhosale Natyagruha)

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबांधणी भूमीपूजन सोहळा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आणि खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, नाट्यगृहाची उभारणीपूर्वी प्रमाणे व्हावी अशी भावना नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य कोल्हापूरकरकरांची होती. निविदा मंजूर झाल्या शिवाय निधी देता येत नाही. आचारसंहिते पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाप्रशासन आणि महापालिकेने बुलेट ट्रेनच्या वेगाने काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ निधी दिली.अर्थमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. खासदार शाहू छत्रपतींनी सुकाणू समितीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र केले. (Keshavrao Bhosale Natyagruha)

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, जिल्हा प्रशासनाने रेकॉर्ड ब्रेक वेळेत निविदा प्रकिया पूर्ण केली आणि राज्य सरकारने ताबडतोब निधी उपलब्ध करुन दिल्याने नाट्यगृह उभारणीचे काम वेगाने होणारआहे. २०२५ मधील गुढी पाडव्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. ही इमारत शासनाची आहे आणि महानगरपालिकेने देखभाल करायची आहे. त्यामुळे इमारत उभारणीवर राज्यसरकार, लोक प्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाचे लक्ष राहिले पाहिजे. अशी सूचना त्यांनी केली.

नाट्यगृहाची सुरक्षितता आणि आपत्कालिन घटनाघडल्यातर कोणती उपययोजना असावी. याचा विचारकरुन बांधकाम झाले पाहिजे याचा पुनरुच्चर ही शाहू छत्रपतींनी केला. नाटयगृह उभारणीनंतर रसिक, प्रेक्षक आणि नागरिक समाधानाने बाहेर पडले पाहिजेत, अशा नाट्यगृहाची उभारणी करा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिशय कमी वेळात दर्जेदार काम व्हावे यासाठी काम करतोय या बद्दल मला आनंद झाला आहे.दीड वर्षात काम पूर्ण करण्याचा सर्वांनी संकल्प आखूया असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, माजी नगरसेवकअदिल फरास, अभिनेते आनंद काळे, इंजिनिअर वेणू गोपाल, श्रीनिवास, चेतन रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आयुक्त मंजूलक्ष्मी यांनी तर रोकडे यांनी आभार मानले. (Keshavrao Bhosale Natyagruha)

पालकमंत्र्यांची गाडी आडवली

श्रीमंत शाहू छत्रपती हे दिल्लीला जाणार असल्याने सकाळी सात वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पोलिसांचा ताफा वेळेत न आल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांचे पी.ए. शिवाजी पाटील यांच्या कारने नाटगृहात आले. पण त्याची कार पोलिसांनी अडवली. कारमधून मुश्रीफ उतरल्याने पोलिसही अवाक झाले. कार्यक्रम लवकर असल्याने पोलिसांचा ताफा येऊ शकला नाही. आचारसंहिता सुरू झाल्यावर हीच सवय ठेवावी लागणार आहे असे पत्रकारांच्या प्रश्नाला मुश्रीफांनी पोलिसांच्या ताफ्याबद्दल उत्तर दिले.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी