स्वाभिमानी जनतेच्या त्सुनामीत ‘केपीं’ची उमेदवारी वाहून जाणार

बिद्री : प्रतिनिधी : राधानगरी मतदार संघातील स्वाभिमानी जनता विकासाला साथ देणारी आहे. भुलभलैया करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचे विरोधकांचे कूटनीतीचे दिवस आता संपले आहेत. मतदारसंघातील विकासकामांनी भारावलेल्या सूज्ञ आणि स्वाभिमानी लोकगंगेच्या त्सुनामीच्या लाटेत ‘केपीं’ची उमेदवारी निश्चितच वाहून जाणार आहे, असा घणाघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला. (Prakash Abitkar)

नाधवडे (ता.भुदरगड) येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी संपूर्ण गावातून काढलेल्या पदयात्रेत प्रचंड संख्येने युवक, महिला आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रविणसिंह सावंत, मदन देसाई, कल्याणराव निकम, अशोकराव भांदिगरे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रविंद्र कामत यांनी केले. (Prakash Abitkar)

नाधवडे फुटलंय नव्हे जमलंय

निवडणूक प्रचारात वारं फिरलंय नाधवडे फुटलंय, अशी अफवा के. पी. पाटील गटाने पसरवली आहे. पण, येथील लोकांचा उदंड प्रतिसाद आणि उत्फूर्त गर्दी पाहून नाधवडे फुटलंय नव्हे, येथे गाव एकत्र जमलंय, असे आमदार आबिटकर म्हणताच लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी