महाराष्ट्रात गेल्यावरच आंदोलन थांबणार

Maharashtra Ekikaran Yuva Samiti

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात सोमवारी (दि.९) होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तथापि, महामेळावा घेणारच आणि महाराष्ट्रात गेल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बोलून दाखवला.

बेळगाव शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्ब्यांग यांनी महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता समितीचा महामेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने धास्ती घेऊन शहरातील धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सीन डेपो अशा पाच ठिकाणी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, माजी आमदार मनोहर किणेकर, समिती नेते आर. एम.चौगुले, शुभम शेळके आणि कार्यकर्त्यांनी व्हॅक्सीन डेपो येथेही भेट देऊन पाहणी केली.

महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल. यापूर्वीही अनेकदा पोलीस खात्याने दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मराठी माणसाने दाद दिली नाही. कोणत्याही परिस्थितीत सोमवारी आम्ही महामेळावा घेणारच असा निश्चय समिती नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Related posts

ED office

ED office : ईडी कार्यालय इमारतीला आग

PM awas

PM awas : महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा

Samiti meeting with pawar

Samiti meeting with pawar : उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करा