Sushila Salunkhe : “विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” : जयसिंगराव सावंत

Sushila Salunkhe

कोल्हापूर : प्रतिनिधी : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांना श्री स्वामी विवेकानद शिक्षण संस्था उभारणीच्या कामात बहुमोल मदत केली. त्यामुळे आपल्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. महाराष्ट्रभर शाखाविस्तार झाला.  त्यामुळे संस्थेच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.  आजच्या विद्यार्थिनींनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचा आदर्श घेऊन आयुष्य घडवावे. असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते जयसिंगराव सावंत यांनी केले.  येथील विवेकानंद कॉलेजमधील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यासकेंद्र, महिला सबलीकरण कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने आयोजित संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या ९८ व्या जयंती निमित ‘संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे : प्रेरणादायी जीवनप्रवास’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे हे होते. (Sushila Salunkhe)

            अध्यक्षीय मनोगतात मा.कौस्तुभ गावडे यांनी,  संस्थामाता ही गुरुदेव कार्यकर्त्यांनी दिलेली पदवी आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याप्रमाणे  संस्थामातांनी त्यागमय जीवन व्यतीत केले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिस्तप्रिय होत्या.  संस्थामाता हया संस्थेत शिकणाऱ्या मुलांवर स्वत:च्या मुलांपेक्षा जास्त प्रेम, माया करत असत.  गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहत असत.  स्त्रीवाद समजून घ्यायचा असेल तर संस्थामातांना समजून घेणे गरजेचे आहे.  असे मनोगत मांडले.  यावेळी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार यांनीही मनोगत मांडले. (Sushila Salunkhe)

संस्थामातांच्या जयंती समारंभा निमित्त्  भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ आयुर्वेद ॲण्ड हॉस्पीटल,कोल्हापूर यांच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य  तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

            कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. स्वागत व  प्रास्ताविक  प्रा. शिल्पा भोसले यांनी केले.  पाहुण्यांची ओळख डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी करुन दिली. आभार  प्रा.गीतांजली साळुंखे यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.

            या कार्यक्रमास आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, डॉ.कविता तिवडे, प्रा.पल्लवी देसाई, , कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. एस के धनवडे, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे स्टाफ सेक्रेटरी,  प्राध्यापक, प्राध्यापिका  व प्रशासकीय कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते. (Sushila Salunkhe)

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या