राज्याच्या गतवैभवासाठी ‘मविआ’ला साथ द्या

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भाजपप्रणित महायुती सरकारने जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधूभाव टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला नेऊन जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील पत्रकार परिषदेत केले.

मोदी यांच्या भाजपा सरकारने जाती-जातींत भांडणे लावून देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न चालवली आहे. सध्या एकाधिकारशाही सुरू आहे.

मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार, काळा पैसा बाहेर काढून तो पैसा पंधरा लाख रुपये प्रमाणे जनतेच्या खात्यावर वर्ग करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी अनेक आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. यामुळे महायुती सरकारविरोधात जनतेत असंतोष आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या योजनेची कॉपी करून त्या योजना महाराष्ट्र राज्यात भाजपा सरकारने सुरू करून जनतेचे दिशाभूल केली आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला.

शिरोळ तालुक्याच्या विकासात दिवंगत माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्यामुळे शिरोळ तालुका व सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. स्वच्छ चेहरा चरित्र संपन्न नेतृत्व विकास कामाची दृष्टी आणि नैतिकतेचे राज-समाजकारण करणाऱ्या गणपतराव पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी आमदार अंजली निंबाळकर बोलताना म्हणाल्या की महाराष्ट्र राज्यातील महिला सुरक्षित नाही. ज्या महिलांनी देशाचे नाव उज्ज्वल केले त्या महिलांचा भाजपा सरकारने अपमान केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पक्षात सामील करून घेतले. अशा भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे.

यावेळी आंध्रप्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व निरीक्षक साके शैलजानाथ, माजी मंत्री व आमदार प्रकाश हुक्कीरे, आमदार राजू कागे, आमदार बी. आर. पाटील, माजी मंत्री व माजी आमदार वीरकुमार पाटील, ए. बी. पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जयसिंगपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह निकम, शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मिनाज जमादार महिला जिल्हा उपाध्यक्षा योगिता घुले, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना चौगुले, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे, प्रतिकसिंह जगदाळे, राजेंद्र कांबळे, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, मुस्लिम ओबीसी संघटनेचे दिलीप कलावंत आदी उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी