अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी घरात अल्लू अर्जुन घरी नव्हता. (Allu Arjun)

उस्मानिया विद्यापीठातील संयुक्त कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी दगडफेकीसह अल्‍लू अर्जुन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्‍यांनी संध्या थिएटरमध्‍ये झालेल्‍या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संयुक्त कृती समितीच्या सहा जणांना ताब्यात घेतले. दरम्‍यान अल्‍लू अर्जुनच्‍या घरात तोडफोडीचा व्‍हिडिओ सोशल मीडिया व्‍यहायल झाला आहे.

जुबली हिल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता अल्‍लू अर्जुनच्‍या हैदराबाद येथील घरावर विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. यासह फलक घेऊन त्याचा निषेध केला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, याप्रकरणाबद्दल अल्लू अर्जुनच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही असे सांगितले. (Allu Arjun)

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड