Soldier Gujar : कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

Soldier Gujar

Soldier Gujar

कोल्हापूर : प्रतिनिधी  : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील सुनिल विठ्ठल गुजर (वय २७ ) या जवानाला वीरमरण प्राप्त  झाले. रविवारी (दि.१६) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जवान गुजर यांच्या पश्चात पत्नी, पाच महिन्याचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. (Soldier Gujar)

गुजर यांच्या नातेवाईकांकडून या संदर्भात माहिती मिळाली. काल गुरुवारी १३ मार्च रोजी भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात रस्त्याचे काम सुरू होते. रोड कटिंग सुरू असताना डोझर दरीत ४०० ते ५०० फूट खाली कोसळला. या अपघातात जवान सुनील गुजर यांना वीरमरण आले. (Soldier Gujar)

जवान गुजर हे २०१९ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजिनियरिंगमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मणिपूर येथे ११० बॉम्बे इंजिनिअरिंगमध्ये सेवा बजावत होते. ते डोजर ऑपरेटवर होते. अरुणाचलमध्ये भूसख्खलन झाल्यानंतर तिथे रस्त्यांचे काम करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंगची टीम भारत चीन सीमेवर गेली होती. तिथे रोड कटिंग करत असताना डोझर दरीत ४०० ते ५०० फूट खाली कोसळला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जवान सुनील गुजर यांचे पार्थिव आज शुक्रवारी सायंकाळी अरुणाचलमधील दिब्रुगड येथे येणार आहे. त्यानंतर गावाकडे पाठवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे. (Soldier Gujar)

हेही वाचा :

कारच्या धडकेत महिला ठार, चालकाचा ओम नम: शिवाय चा जप

Related posts

Topate

Topate : काँग्रेसमध्ये निष्ठेचे फळ मिळाले नाही

Hindi optional

Hindi optional: हिंदी सक्तीबाबत सरकार बॅकफूटवर!

Bumrah, Mandhana

Bumrah, Mandhana : बुमराह, मानधनाचा सन्मान