गोंदियात शिवशाही उलटून १२ ठार

Shivshahi Accident

मुंबई : प्रतिनिधी : अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रस्त्यावर शिवशाही बसचा अपघात झाला. शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ लोक जखमी असल्याची माहिती माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान शिवशाही (एमएच ०९/ईएम १२७३) बसचा अपघात झाला. दुचाकी अचानक समोर आली. दुचाकीचालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात चालकाचा शिवशाही बसवरील ताबा सुटला आणि‍ बस उलटली. बसमध्ये ४० प्रवासी होते.

डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. शिंदे यांनी गोंदिया-केहमारा मार्गावर डव्वाजवळ झालेल्या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडून घेतली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. प्रवाशांच्या माहितीवरून रुग्णवाहिका विभाग आणि पोलिस विभागाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख

गोंदिया एस.टी. अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत. शिंदे यांनी एस.टी. अपघातासंदर्भात स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Related posts

ACB Raid

ACB Raid : लाच घेताना दोघांना अटक

MVA Conflict

MVA Conflict : पराभवाच्या नैराशेतून ‘मविआ’मध्ये वादाच्या ठिणग्या!

convocation

convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी