shivraj rakshe fight : पैलवान राक्षेने धरली पंचाची कॉलर, लाथही मारली

shivraj rakshe fight

अहिल्यानगर : प्रतिनिधी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पंचांचा निर्णय अमान्य झाल्याने पराभूत मल्ल डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने स्पर्धेला गालबोट लावले. पंचाचा निर्णयावर त्याने आखाड्यात हल्लाबोल केला. त्याने पंचाच्या अंगावर धाऊन जात कॉलर खेचली. तसेच पंचांना लाथही घातली. अखेर पोलिस आणि संयोजकांनी धाव घेत त्याला मैदानाबाहेर घालवले.(shivraj rakshe fight)
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विदयमाने स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत गेले तीन दिवस महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलीत चटकदार कुस्त्या झाल्या. राज्यातील ८६० मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता..(shivraj rakshe fight)
गादी विभागात नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या मुरलीधर मोहोळ यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीकडे कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले होते. गादी गटातील विजेता महाराष्ट्र केसरी गदेच्या अंतिम लढतीसाठी लढणार होता. त्यामुळे या कुस्तीला महत्व होते. डबल महाराष्ट्र शिवराज राक्षे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावून हॅटट्रीकसाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने या लढतीकडे जास्त लक्ष दिले. .(shivraj rakshe fight)
मान्यवरांच्या हस्ते सलामी झडताच मुख्य पंचानी दोन्ही मल्लांना सूचना दिली. पहिल्या फेरीची लढत सुरू झाल्यावर काही सेंकदातच डोळ्याचे पाते न लवतेच मुरलीधर मोहोळने शिवराज राक्षेला चितपट करुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पंचाच्या निर्णयावर शिवराज राक्षेला अमान्य होता. त्यांच्या समर्थकांनी मैदानावर धाव घेतली. शिवराज आणि त्यांच्या समर्थकांनी काही काळ गोंधळ घातला. शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरली. तसेच पंचालाही लाथही मारली. पण पोलिस अधिकारी आणि संयोजकांनी शिवराज राक्षेला आवरले. आणि त्याला आखाड्यातून बाहेर काढले..(shivraj rakshe fight)
आखाड्यातून बाहेर पडलेला शिवराज राक्षेने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवर मंत्री बसलेल्या स्टेजवर मोर्चा वळवला. तिथे त्याने परत कुस्ती खेळवण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याची समजूत काढून त्याला स्टेजवरुन उतरवले. त्यानंतर कडक बंदोबस्तात त्याला आणि त्याच्या समर्थकांना मैदानाबाहेर घालवण्यात आल्यानंतर मैदानावरील तणाव कमी झाला.

हेही वाचा :

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’
भारत पुन्हा ‘वर्ल्ड ग्रुप-१’मध्ये
भारत दुसऱ्यांदा जगज्जेता

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय