Convocation : ५१ हजारांवर स्नातकांना मिळणार पदवी

convocation

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात ५१ हजार ४९२ स्नातकांना पदवी देण्यात येणार आहे. (convocation)

विद्यापीठातील जैवरसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी बंडू राजू कोळी यांना राष्ट्रपती सुवर्णपदकाने तर मानसशास्त्र विभागातील नोरोन्हा क्रिशा अल्दा यांना कुलपती सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार आहे. समारंभाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. दीक्षान्त सोहळा राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. (convocation)

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अध्यक्षस्थान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन भूषवणार असून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अशिष लेले प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

समारंभात १४ हजार २६९ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत. त्यामध्ये ५८५६ विद्यार्थी तर ८४१३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पोस्टाद्वारे १७ हजार ४१ विद्यार्थांना तर २० हजार १८२ विद्यार्थिनींना पदवी पाठवण्यात येणार आहे.(convocation)

दीक्षान्त समारंभाच्या आदल्या दिवशी, गुरुवारी १६ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन होणार होणार आहे. साडेअकरा वाजता गायिका डॉ. साधना शिलेदार यांच्या ‘तुकोबांची अंभगवाणी’ हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा :
 ‘पाटाकडील’ ‘सम्राटनगर’ सामना बरोबरीत

Related posts

Krishna Menase Death : कॉम्रेड कृष्णा मेणसे कालवश

Magnificent rangoli : ११ एकरांत छत्रपती शिवरायांची भव्य रांगोळी

Tiku Talsania : अभिनेते टिकू तलसानिया यांना ‘ब्रेन स्ट्रोक’